india post office recruitment 2025 (ग्रामीण डाकसेवक)

 



भारतीय डाक विभागात २१,४१३ पदांसाठी मेगाभरती! १०वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी


भारतीय डाक विभागाने (India Post) २०२५ मध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), आणि डाक सेवक या पदांवर एकूण २१,४१३ जागा भरण्यात येणार आहेत, ज्यात महाराष्ट्रासाठी सुमारे १,४७३ ते १,४९८ पदे समाविष्ट आहेत.


✔️एकूण जागा: 21,413


✔️शैक्षणिक पात्रता: 10वी पास (गणित आणि इंग्रजी पास अनिवार्य आहे).


✔️इतर कौशल्ये: संगणकाचे ज्ञान आणि बाइक चालवण्याची क्षमता.


✔️वयोमर्यादा: १८ ते ४० वर्षे (SC/ST उमेदवारांसाठी ५ वर्षे, OBC साठी ३ वर्षे सवलत).


✔️वेतनश्रेणी: 

BPM पद: ₹१२,००० ते ₹२९,३८० प्रतिमहिना.

ABPM/डाक सेवक: ₹१०,००० ते ₹२४,४७० प्रतिमहिना.


✔️निवड पद्धत: १०वी च्या गुणांवर आधारित मेरिट यादी.


✔️अर्ज शुल्क: सामान्य, OBC आणि EWS उमेदवारांसाठी ₹100;

      SC, ST, महिला आणि PWD उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही.


✔️अर्जाची अंतिम तारीख: ३ मार्च २०२५


Post a Comment