सरळ सेवा परीक्षेसाठी पुस्तक सूची
सरळ सेवा परीक्षा ही महाराष्ट्र सरकारच्या (पोलीस भरती , तलाठी, वनरक्षक , ग्रामसेवक , लेखापाल , महानगरपालिका इ.) विविध कार्यालयीन होणारी महत्त्वाची परीक्षा आहे. या परीक्षेच्या तयारीसाठी योग्य पुस्तकांची निवड करणे गरजेचे आहे. या लेखात आम्ही सरळ सेवा परीक्षेच्या विविध विषयांसाठी उपयुक्त अशी पुस्तकांची सूची सादर करत आहोत.
1) मराठी भाषा (Marathi Language)
a) Balasaheb Shinde - Marathi Vyakaran - Saralseva TCS & IBPS Pattern
2) इंग्रजी व्याकरण (English Grammar)
a) Balasaheb Shinde - Engraji Vyakaran - Saralseva TCS & IBPS Pattern
b) M. J. SHAIKH - Spardha Pariksha Atyavashyak Engraji Vyakaran
3) गणित (Mathematics)
गणितातील बेरीज-वजाबाकी, शेकडेवारी, सरळ व्याज, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी सरावासाठी:
a) Sankhyatmak Abhiyogyata – Ankganit - Sachin Dhawale
b) Quantitative Aptitude for Competitive Exams — आर.एस. अग्रवाल (मराठी भाषांतर उपलब्ध)
4) सामान्य ज्ञान (General Knowledge)
महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, चालू घडामोडी आणि भारतीय राज्यघटना यावर प्रश्न असतात.
a) TATYACHA THOKLA-EKNATH PATIL
5) तार्किक क्षमता (Reasoning Ability)
तार्किक प्रश्न, कोडिंग-डिकोडिंग, श्रेणीक्रम, आकृती मालिका यासाठी:
a) Buddhimatta Chachani Ani TarkKskhamata Parikshan - Sachin Dhawale
b) A Modern Approach to Verbal & Non-Verbal Reasoning" — आर.एस. अग्रवाल (मराठीत उपलब्ध)
6) सराव पेपर्स आणि मार्गदर्शक (Practice Papers & Guides)
a) Bee Publication - 21000+ Prashnasanch - TCS
तयारीच्या टिप्स (Preparation Tips)
१. नियोजन: दररोज ४-५ तास अभ्यास आणि सराव.
२. कमकुवत विषयांवर लक्ष: गणित आणि तर्कशक्तीत नियमित सराव करा.
३. चालू घडामोडी: दैनिक वर्तमानपत्रे (लोकमत, महाराष्ट्र टाइम्स) वाचा.
४. मागील प्रश्नपत्रिका: परीक्षेचा नमुना समजून घ्या.
सरळ सेवा परीक्षेची तयारी करताना योग्य पुस्तके निवडणे आणि व्यवस्थित अभ्यास करणे गरजेचे आहे. वरील पुस्तकांमधून संपूर्ण सिलॅबस कव्हर करून, नियमित सराव करा. परीक्षेच्या दिवशी स्वावलंबी आणि निश्चिंत राहा. शुभेच्छा!
टीप: पुस्तके खरेदी करण्यापूर्वी अद्ययावत आवृत्ती आणि परीक्षा पॅटर्नशी सुसंगतता तपासा.
Post a Comment