Hindustan Urvarak & Rasayan Limited (HURL) Bharti 2024 Notification Out

 

नमस्कार मित्रांनो नौकरीमित्र वर तुमचं सर्वांचे स्वागत आहे.मित्रहो HURL,ज्याचा अर्थ हिंदुस्तान फर्टिलायझर्स आणि रसायन लिमिटेड आहे, ही सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) आहे जिथे IOCL, कोल इंडिया लिमिटेड, आणि NTPC सारख्या कंपन्यांशी संबंधित आहे. कंपनी खत निर्मितीवर लक्ष केंद्रित करते. त्याचं एक नोटिफिकेशन आलं GT साठी म्हणजे ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनिंग साठी ज्यांचं बीई बीटेक आहे आणि डिप्लोमा वाल्यांसाठी सुद्धा चांगल्या व्हॅकन्सीज आहेत. इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि केमिकल यांसारख्या विविध अभियांत्रिकी क्षेत्रातील BE/BTech पदवीधर आणि डिप्लोमा धारकांसाठी चांगली संधी आहे. या पदांसाठी आकर्षक फायदे आहेत.


✔️पदाचे नाव : पदवीधर इंजिनिअर प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा इंजिनिअर प्रशिक्षणार्थी.


✔️एकूण जागा: 212


✔️पात्रता: सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.


✔️वयोमर्यादा: पदवीधर इंजिनिअर प्रशिक्षणार्थी साठी 18 – 30 वर्ष आणि डिप्लोमा इंजिनिअर प्रशिक्षणार्थी साठी 18 – 27  वर्ष.या वयोमर्यादेमध्ये अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना विशेष सवलत दिली जाते.


✔️वेतनश्रेणी: पदवीधर इंजिनिअर प्रशिक्षणार्थी साठी : ₹ 40000-140000/- plus benefits आणि डिप्लोमा इंजिनिअर प्रशिक्षणार्थी साठी : ₹ 23000 -76200/- plus benefits


✔️निवड प्रक्रिया: लेखी चाचणी


✔️परीक्षा फीस : पदवीधर इंजिनिअर प्रशिक्षणार्थी पदासाठी 750/-.डिप्लोमा इंजिनिअर प्रशिक्षणार्थी पदासाठी 500/-


✔️नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत


✔️ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2024



Post a Comment